Share

विद्याधर जोशींचा संतप्त सवाल: बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ अचानक गायब; नेमकं चाललंय काय?

बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ रम अचानक गायब झाल्याने अभिनेते विद्याधर जोशींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा साखळीतील बिघाड हे यामागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

Published On: 

Old Monk Out of Stock Actor Vidyadhar Joshi asks questions on social media about rum shortage

🕒 1 min read

सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे राजकारणही चांगलंच तापलंय. पण या सगळ्या गोंधळात तळीरामांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक मोठी बातमी समोर आलीये. ऐन पावसाळ्यात बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ (Old Monk) ही लोकप्रिय रम अचानक गायब झाली आहे!

एरवी राजकीय किंवा सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होणारे लोकप्रिय मराठी अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) यांनी थेट सोशल मीडियावर या विषयाला हात घातला आहे.

Old Monk Out of Stock

“सध्या आजूबाजूला गंभीर प्रश्न आहेत हे मान्य, पण गेले काही दिवस बाजारात, बारमध्ये किंवा क्लबमध्ये कुठेच ओल्ड मॉन्क मिळत नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय झालाय? त्यात हा पाऊस असा!” अशी पोस्ट करत त्यांनी थेट प्रशासनाला आणि दारू कंपन्यांनाच सवाल विचारला आहे.

विद्याधर जोशींच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही अक्षरशः उड्या मारल्या आहेत. ‘समदुःखी’, ‘हा खूप मोठा प्रश्न आहे’, ‘आपलं दुःख सारखंच आहे’, अशा भन्नाट कमेंट्सचा पाऊस या पोस्टवर पडतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळा आणि पावसाळ्यात ओल्ड मॉन्कला मोठी मागणी असते. परवडणारा दर आणि चव यामुळे दुकानात माल येताच काही दिवसांत तो संपून जातो.

मुळात ओल्ड मॉन्कचं मुख्य उत्पादन उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि लखनौमध्ये होतं. तिथून ती देशभरात वितरीत केली जाते. या पुरवठा साखळीत थोडा जरी बिघाड झाला, तरी स्थानिक बाजारात लगेच तुटवडा निर्माण होतो.

दुसरीकडे, प्रत्येक राज्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कडक नियम आणि परवाने मिळण्यात होणारा उशीर यामुळेही नव्या स्टॉकला ब्रेक लागतो. सध्या कंपनी आणि स्थानिक डिस्ट्रीब्यूटर्सकडून हा अडथळा दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांत ओल्ड मॉन्कचा स्टॉक पुन्हा वाईन शॉपमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र तळीरामांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही