Share

Cloud Research: ढगांमध्ये आढळले ब्लॅक कार्बनचे कण; पावसाच्या प्रक्रियेवर होऊ शकतो परिणाम

IITM च्या संशोधनात नैऋत्य मोसमी पावसाच्या ढगांमध्ये ब्लॅक कार्बनचे सूक्ष्म कण आढळले असून, त्याचा पावसाच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो, असा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.

Published On: 

Rain Update

Rain Update : भारतातील दुष्काळप्रवण आणि पर्जन्यछायेच्या भागांमध्ये येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाच्या ढगांमध्ये रिफ्रॅक्टरी ब्लॅक कार्बन (Black Carbon) (काजळीचे सूक्ष्म कण) आढळल्याचे एका नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) शास्त्रज्ञांनी विमान मोहिमेद्वारे केला. या संशोधनासाठी वातावरणातील हवा आणि ढगांतील पाण्याच्या थेंबांचे नमुने विमानातून गोळा करण्यात आले. त्यानंतर त्यांचे सखोल विश्लेषण करून ब्लॅक कार्बनचे अस्तित्व आणि त्याचा परिणाम अभ्यासण्यात आला.

ढगांच्या निर्मितीवर होऊ शकतो परिणाम

संशोधकांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, वातावरणात ब्लॅक कार्बनचे प्रमाण वाढत राहिल्यास त्यातून निर्माण होणारी उष्णता ढगांच्या निर्मितीवर आणि पावसाच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. अभ्यासात ढगांच्या खालच्या स्तरावर ब्लॅक कार्बनचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. ढगांच्या आतील भागात हे प्रमाण बाहेरील वातावरणाच्या तुलनेत 10 ते 20 पट कमी होते. तसेच 7 मायक्रॉनपेक्षा मोठ्या पाण्याच्या थेंबांपैकी केवळ 3 टक्के थेंबांमध्ये ब्लॅक कार्बनचे कण आढळले.

ब्लॅक कार्बन धोकादायक का?

ब्लॅक कार्बन उष्णता शोषून घेत असल्यामुळे स्थानिक तापमान वाढते. हे कण ढगांमध्ये पोहोचल्यानंतर पाण्याचे सूक्ष्म थेंब मोठ्या पावसाच्या थेंबात रूपांतरित होण्याऐवजी त्यांचे बाष्पीभवन होऊ शकते. या प्रक्रियेला ‘सेमी-डायरेक्ट इफेक्ट’ असे म्हटले जाते, ज्यामुळे पावसाच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

मराठवाडा-विदर्भासाठी महत्त्वाचा अभ्यास

संशोधकांच्या मते, मराठवाडा आणि विदर्भासारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशांमध्ये ब्लॅक कार्बनसारख्या प्रदूषकांचा ढगांची निर्मिती आणि पावसाच्या प्रक्रियेवर नेमका कसा परिणाम होतो, याबाबत या संशोधनातून महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे मिळाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही