Share

New EPF Scheme 2026: आता हातात येणार जास्त पगार? नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

New EPF Scheme 2026 अंतर्गत अनिवार्य PF योगदानाच्या नियमांमध्ये बदल झाल्याने कर्मचाऱ्यांना अधिक टेक-होम पगाराचा पर्याय मिळू शकतो, मात्र निवृत्ती बचतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Published On: 

New EPF Scheme 2026

New EPF Scheme 2026: केंद्र सरकारने (Central Government) नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय घेत नवीन EPF Scheme 2026 लागू केली आहे. या योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund (EPF) संदर्भातील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या टेक-होम पगारावर (Take Home Salary) त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.

नवीन नियम काय सांगतो?

सध्याच्या नियमानुसार, EPF साठी 15,000 रुपयांपर्यंतच्या बेसिक पगारावर 12 टक्के योगदान अनिवार्य आहे. म्हणजे कर्मचारी आणि कंपनी या दोघांकडून प्रत्येकी 1,800 रुपये EPF खात्यात जमा केले जातात.

यापूर्वी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष बेसिक पगारावर 12 टक्के PF (PF New Rules) कापत होत्या. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत EPF कपात होत असे. नव्या नियमानुसार 1,800 रुपयांपेक्षा जास्त योगदान सक्तीचे राहणार नाही. त्यासाठी कर्मचारी आणि कंपनी या दोघांचीही संमती आवश्यक असेल.

उदाहरणातून समजून घ्या

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 60,000 रुपये आहे. पूर्वी त्याच्या पगारातून 7,200 रुपये EPF म्हणून कापले जात होते. आता जर किमान अनिवार्य योगदानाचा पर्याय निवडला, तर फक्त 1,800 रुपये EPF मध्ये जमा होतील. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा टेक-होम पगार दरमहा सुमारे 5,400 रुपयांनी वाढू शकतो.

जास्त EPF योगदान देता येणार का?

होय, निवृत्तीसाठी अधिक बचत करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच जास्त EPF योगदान देण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. मात्र, यासाठी कर्मचारी आणि कंपनी या दोघांचीही संमती आवश्यक असेल. म्हणजेच जास्त PF कपात बंद झालेली नाही, तर ती ऐच्छिक करण्यात आली आहे.

कंपन्यांनाही होणार फायदा

या बदलामुळे कंपन्यांना त्यांच्या वेतन संरचनेत अधिक लवचिकता मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या संमतीने अनिवार्य PF योगदान मर्यादित केल्यास कंपन्यांचा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे कंपन्या हा निधी इतर कर्मचारी सुविधांवर किंवा व्यवसाय विस्तारासाठी वापरू शकतात.

कमी PF निवडणे योग्य ठरेल का?

हा निर्णय प्रत्येकाच्या आर्थिक गरजांवर अवलंबून आहे. ज्यांना सध्या गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्यासाठी हातात अधिक पगार मिळणे फायदेशीर ठरू शकते.

मात्र, EPF हा सरकारच्या पाठबळासह सुरक्षित, करसवलत देणारा आणि आकर्षक व्याज मिळवून देणारा गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. त्यामुळे PF योगदान कमी केल्यास भविष्यातील निवृत्ती निधीवर परिणाम होऊ शकतो, असा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला आहे.

EPF Scheme 2026 मधील इतर बदल

नवीन EPF Scheme 2026 अंतर्गत पैसे काढण्याची प्रक्रिया देखील सुलभ करण्यात आली आहे. पूर्वीच्या अनेक स्वतंत्र श्रेणी कमी करून आता तीन प्रमुख प्रवर्ग ठेवण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण प्रक्रिया अधिक डिजिटल करण्यात आल्याने EPF सेवा अधिक सोपी आणि जलद होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही