Share

दुधाला चक्क २०० रुपये लिटरचा भाव! ५ लिटर दूध देणाऱ्या ‘या’ परदेशी शेळीने उघडले शेतकऱ्यांचे नशिबाचे दरवाजे

दिवसाला ३ ते ५ लिटर दूध देणारी स्वित्झर्लंडची सानन शेळी भारतीय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या दुधाला बाजारात २०० रुपये लिटर भाव मिळतो.

Published On: 

Saanen Goat Farming - High milk yielding Saanen goat breed in a dairy farm

तुम्हाला कोणी सांगितलं की, एका शेळीचं दूध चक्क १५० ते २०० रुपये लिटरने विकलं जातं, तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे शंभर टक्के खरंय. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन (Goat Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता एक परदेशी जात अक्षरशः ‘सोन्याची खाण’ ठरत आहे.

आपल्याकडच्या गावरान शेळ्या फार तर एक-दोन कप दूध देतात. पण स्वित्झर्लंडची ‘सानन’ (Saanen Goat) नावाची ही शेळी दुग्धोत्पादनात भल्याभल्या गाई-म्हशींनाही जोरदार टक्कर देत आहे. जगभरात सर्वाधिक दूध देणारी शेळी म्हणून तिची ओळख असून, सध्या भारतीय बाजारात या शेळीला प्रचंड मागणी आहे.

Saanen Goat

सानन जातीची ही शेळी योग्य निगा राखल्यास आणि चांगला चारा मिळाल्यास दिवसाला सहज ३ ते ५ लिटर दूध देते. वर्षभराचा हिशेब केला तर हा आकडा थेट ८०० ते १००० लिटरच्या घरात जातो. त्यामुळेच व्यावसायिक शेळीपालनासाठी किंवा बचत गटांसाठी ही जात अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या शेळीचं दूध केवळ घट्ट आणि पौष्टिकच नसतं, तर त्यापासून दर्जेदार पनीर, तूप आणि खवा तयार होतो. दुसरीकडे, आजकाल सौंदर्यप्रसाधनांमध्ये (Cosmetics) शेळीच्या दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, बाजारात सानन शेळीच्या दुधाला विक्रमी भाव मिळतो.

आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही शेळी विकत घ्यायची कशी आणि तिची किंमत किती? भारतीय बाजारात वय, आरोग्य आणि दूध देण्याच्या क्षमतेनुसार सानन शेळीची किंमत २५ हजार ते ४० हजार रुपयांच्या घरात आहे.

तुम्हाला उच्च दर्जाची आणि नोंदणीकृत शेळी हवी असल्यास त्यासाठी ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागू शकतात. तर, चांगल्या पैदाशीसाठी बोकड खरेदी करायचा असल्यास २० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. एकूणच, कमी खर्चात जास्त नफा कमवायचा असेल, तर सानन शेळी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी हुकमी एक्का ठरू शकते.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही