Share

Ashadhi Wari 2026: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! आषाढी वारीसाठी १६ विशेष रेल्वे

आषाढी वारी २०२६ साठी मध्य रेल्वेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर मार्गावर १६ विशेष रेल्वे फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On: 

Ashadhi Wari 2026: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! आषाढी वारीसाठी १६ विशेष रेल्वे

Ashadhi Wari 2026 : यंदाची आषाढी वारी ७ जुलैपासून सुरू होणार असून, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने मार्गस्थ होणार आहेत. वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष रेल्वे (Special Train) गाड्यांचे नियोजन केले आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi) सोहळ्याचे प्रस्थान ७ जुलै रोजी देहूहून (Dehu) होणार असून, २५ जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. यंदा संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा पालखी सोहळा पार पडणार आहे.

तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dyaneshwar Maharaj Palkhi) ८ जुलै रोजी आळंदीहून (Alandi) पंढरपूरकडे रवाना होईल आणि २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. या प्रवासात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा १७ ठिकाणी मुक्काम असणार आहे.

पंढरपूरसाठी १६ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ-पंढरपूर, नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर या मार्गांवर एकूण १६ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष रेल्वेमुळे खान्देश आणि विदर्भातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे

भुसावळ-पंढरपूर मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून सुटेल.

परतीची गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून रवाना होईल. या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

नागपूर-मिरज विशेष रेल्वे

नागपूर-मिरज विशेष रेल्वे (क्रमांक ०१२०५) २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल.

परतीची गाडी (क्रमांक ०१२०६) २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचेल.

नवी अमरावती आणि खामगावहूनही विशेष गाड्या

नवी अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वे (क्रमांक ०१११९) २१ आणि २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता रवाना होईल. परतीची गाडी (क्रमांक ०११२०) २२ आणि २५ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून सुटेल.

खामगाव-पंढरपूर विशेष रेल्वे (क्रमांक ०११२१) २१ आणि २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगावहून धावेल. तर परतीची गाडी (क्रमांक ०११२२) २२ आणि २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून रवाना होईल.

आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांची होणारी गर्दी आणि प्रवासाची गरज लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे विठ्ठल भक्तांना मोठा फायदा होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही