Share

शिवप्रेमींसाठी गुडन्यूज! किल्ले रायगडावर सरकारी रोप-वेला मंजुरी

किल्ले रायगडावर नवीन शासकीय रोपवे उभारणीला पुरातत्व विभागाची मंजुरी मिळाली असून शिवभक्तांना आता कमी दरात गडावर पोहोचता येणार आहे.

Published On: 

शिवप्रेमींसाठी गुडन्यूज! किल्ले रायगडावर सरकारी रोप-वेला मंजुरी

रायगड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर (Raigad Fort) जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रायगडावर नवीन शासकीय रोपवे (Govt Ropeway) उभारण्यास मंजुरी मिळाली असून, या सुविधेमुळे गडावर जाण्याचा प्रवास अधिक सोपा आणि कमी खर्चात होणार आहे.

दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तसेच वर्षभर हजारो शिवभक्त (Shivbhakt) आणि पर्यटक रायगडाला भेट देतात. त्यांच्यासाठी आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अत्याधुनिक रोपवे उभारण्यात येणार आहे. या रोपवेसाठी प्रतिव्यक्ती अंदाजे 50 ते 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संभाजीराजेंच्या पाठपुराव्याला यश

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नवीन शासकीय रोपवे उभारण्यासाठी दिल्लीतील पुरातत्व विभागाकडे गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा अत्याधुनिक रोपवे उभारण्यास पुरातत्व विभागाने मान्यता दिली आहे.

350 रुपयांऐवजी आता 100 रुपयांपर्यंत शुल्क

सध्या रायगडावर असलेल्या खासगी रोपवेसाठी पर्यटकांना सुमारे 325 ते 350 रुपये शुल्क द्यावे लागते. मात्र नवीन सरकारी रोपवे सुरू झाल्यानंतर हा प्रवास 50 ते100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी दरात करता येणार आहे. याशिवाय रायगड संवर्धनाच्या कामांसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूकही कमी खर्चात करता येणार असल्याने कोट्यवधी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.

संवर्धन कामांना मिळणार फायदा

सध्याच्या खासगी रोपवेमुळे गडावरील बांधकाम आणि संवर्धनासाठी साहित्य वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यामुळे सरकारी रोपवे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रोपवे निर्मितीला सुरुवात होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही