Share

विश्वास नांगरे पाटील प्रकरणात भाजपची एन्ट्री; चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ ऑफर

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांच्या RSS मुख्यालय भेटीवरून सुरू झालेल्या वादात भाजपचे चंद्रकांत पाटलांनी त्यांची पाठराखण करत संघाची शाखा जॉईन करण्याचे आवाहन केले.

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयातील भेटीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या एका व्हिडिओनंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तर सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

चंद्रकांत पाटलांची नांगरे पाटलांना खुली ऑफर

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विश्वास नांगरे पाटील यांची बाजू घेतली. RSS मुख्यालयाला भेट देणे यात काहीही चुकीचे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही देशविरोधी संघटना नाही. देशप्रेम आणि सामाजिक मूल्यांची शिकवण देणारी संघटना आहे. संघाच्या शाखांमध्ये संस्कार आणि विचारांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी संघाची शाखा जॉईन केली तर त्यातून त्यांना चांगले विचार आणि मार्गदर्शन मिळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नेमकं काय आहे विश्वास नांगरे पाटील प्रकरण?

विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका हिंदू संमेलनात RSS आणि संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) यांच्या कार्याचा उल्लेख करताना दिसत आहेत. या वक्तव्यानंतर सरकारी सेवेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिक मंचावर अशा प्रकारची भूमिका मांडणे योग्य आहे का? यावर चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्यांच्या विचारस्वातंत्र्याचे समर्थन केले, तर काहींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तटस्थ भूमिका ठेवावी, असे मत व्यक्त केले आहे.

काँग्रेसचा नांगरे पाटलांवर निशाणा

या मुद्द्यावर महाराष्ट्र काँग्रेसनेही (Congress) प्रतिक्रिया देत नांगरे पाटील यांच्यावर टीका केली आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही विशिष्ट वैचारिक किंवा राजकीय भूमिकेचे सार्वजनिक समर्थन करणे योग्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनात तटस्थता जपली पाहिजे, असा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्तीही राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही