Share

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा दावा; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी ड्रग लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Published On: 

Tukaram Mundhe

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कामकाजावरून आणि संभाव्य बदलीच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानसभेत गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे.

तुकाराम मुंढे हे FDA आयुक्त झाल्यानंतर विभागातील कारवाईला वेग आला आहे. भेसळ आणि औषधांच्या गुणवत्तेच्या मुद्द्यावर त्यांनी कठोर भूमिका घेतल्याचे आव्हाड यांनी म्हटले. मात्र, त्यांच्या कामामुळे काही लॉबी नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

आव्हाड यांनी दावा केला की, “तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबी (International Drug Lobby) आणि मेडिकल कंपन्यांकडून (Medical Company) 250 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.” या प्रकरणातील संबंधितांची नावे पुढील आठवड्यात उघड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ड्रग आणि मेडिकल लॉबीवर निशाणा

विधानसभेत बोलताना आव्हाड म्हणाले की, ड्रग्ज लॉबी आणि मेडिकल कंपन्या एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सक्रिय झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागावर नेमका कोणाचा प्रभाव आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भेसळयुक्त पदार्थ, गुटखा आणि बनावट मालाच्या विक्रीवर प्रश्न उपस्थित करत आव्हाड यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “पालघरला गुटखा उतरतो आणि तो महाराष्ट्रभर कसा पोहोचतो?” असा सवाल त्यांनी केला.

मंत्र्यांवर दबाव असल्याचा दावा

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे साधे व्यक्ती असून त्यांच्यावर परिस्थितीचा दबाव आहे. महाराष्ट्राला वाचवणार असेल तर जनतेने यात लक्ष घातले पाहिजे. तांदळाची भेसळ होते, आश्रम शाळेत जाते. ती कोण रोखणार? असा सवाल देखील आव्हाड यांनी केला आहे.

तुकाराम मुंढेंच्या जीवाला धोका

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या कामाचे समर्थन करत काही आमदारांनी त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आमदार अर्जुन खोतकर यांनी मुंढे यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. नरहरी झिरवाळ यांनी मात्र तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. FDA विभागाकडून चांगले काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांमुळे तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या आरोपांवर पुढे काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही