Share

“पैसा फेको तमाशा देखो”; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटावर पैशांच्या राजकारणाचा आणि खासदार फुटीचा आरोप करत जोरदार टीका केली.

Published On: 

Sanjay Raut

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटावर जोरदार निशाणा साधला. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे ठाकरे गटातील (Thackeray Gat) खासदारांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. खासदार राऊत यांनी आकडेवारीचा दाखला देत हे आरोप फेटाळून लावले.

राऊत म्हणाले की, विरोधी पक्षातील खासदारांना सरकारकडून विकास निधी मिळत नसल्याचा दावा चुकीचा आहे. “खासदारांना मिळालेला निधी वापरलाच गेला नाही. मग निधी मिळत नव्हता, हा दावा कशाच्या आधारावर?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) निकालावर भाष्य करत राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपावर(BJP) टीका केली. “शिंदे पक्षाचा नाशिक विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. भाजपची सर्व मते गोकुळ गिते (Gokul Geete) यांना पडली. मात्र दोन तासांत गोकुळ गिते यांना आपल्या पक्षात घेण्यात आले. “गीते यांना शिंदे यांनी विकत घेतलं.” ‘पैसा फेको तमाशा देखो’ ही महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे.” असा आरोप त्यांनी केला.

खासदारांच्या पक्षांतरावर बोलताना राऊत यांनी दावा केला की, “हे खासदार निधीसाठी गेले, पण त्यांच्याकडे आधीच कोट्यवधींचा विकास निधी शिल्लक होता. अनेक खासदारांनी उपलब्ध निधीचा वापर केलेला नाही.” तसेच ठेकेदारी आणि कमिशनच्या माध्यमातून राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुढे राऊत म्हणाले, “एका खासदारांचा सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. मग विकास निधीसाठी अडवणूक कुठे झाली? “बाळासाहेब ठाकरे यांनी पाळणाघर आणि वृद्धाश्रम यांसारखी समाजोपयोगी कामे केली. मात्र तुम्ही ठेकेदारांची पाळणाघरे तयार केली,” अशी टीका राऊत यांनी केली.

शिंदे गटातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “बाळासाहेबांच्या पाळणाघरातूनच अनेक जण पुढे आले. नाहीतर त्यांना कोणी विचारले नसते.”

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे २७ तारखेपासून संबंधित मतदारसंघांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. पक्ष सोडलेल्या खासदारांविरोधात जनतेत नाराजी असल्याचा दावाही त्यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही