Share

गोकुळ गीते विजयी अन् दराडेंचा संताप! “महायुतीच्या लोकांनी माझा विश्वासघात केला”

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार Gokul Geete यांच्या विजयानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील नेत्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत त्यांनी पराभवाचे खापर अंतर्गत राजकारणावर फोडले आहे.

Published On: 

🕒 1 min read

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निकालानंतर महायुतीमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Geete) यांच्या विजयानंतर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी पहिली प्रतिक्रिया देताना महायुतीतील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

“माझा विश्वासघात झाला आहे. महायुतीच्या लोकांनी माझा विश्वासघात केला,” अशा शब्दांत नरेंद्र दराडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अपवाद वगळता महायुतीतील इतर नेत्यांनी आपल्याला साथ दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

दराडे म्हणाले, “महायुतीमध्ये असूनही अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी आतून दुसऱ्यांना पाठिंबा दिला. त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली गेली. मी मात्र आशेवर राहिलो. मला अंधारात ठेवून माझी ताकद कमी करण्यात आली.”

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे निवडणूक चुरशीची झाली होती. भाजपशी संबंधित काही नेत्यांनी तसेच शिवसेना शिंदे गटातील एका आमदाराने पडद्यामागून गीते यांना मदत केल्याची चर्चा निवडणुकीदरम्यान रंगली होती.

या मतदारसंघात एकूण ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले होते. भाजपमधील बंडखोरी आणि अंतर्गत मतभेदांमुळे नाशिकची निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

गोकुळ गीते यांची बंडखोरी थोपवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि दादा भुसे यांना नाशिकमध्ये बैठका घ्याव्या लागल्या होत्या. मात्र, अखेर गीते यांच्या विजयामुळे महायुतीसमोर नवीन राजकीय आव्हान उभे राहिले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही