Share

‘भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून…’; पत्रिकेतून शिंदेंचं नाव वगळताच प्रकाश महाजनांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

नवी मुंबई मनपाच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने प्रकाश महाजन संतापले आहेत. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत ‘ऑपरेशन टायगर’चे सूचक संकेत दिले आहेत.

Published On: 

Ladki Bahin Yojana 2100: शिंदेंचा मोठा खुलासा!

मुंबई– स्वतःच्याच सरकारमधील दिग्गज मंत्र्यांचं आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं नाव एखाद्या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेतून कुणी कसं काय वगळू शकतं? नवी मुंबईत सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून, यावरून आता राजकीय राडा सुरू झाला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका वैद्यकीय सुविधांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून थेट ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन चांगलेच भडकले असून, त्यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जहरी टीका केली आहे.

गणेश नाईकांचे ‘माकड चाळे’: प्रकाश महाजन संतापले

“भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून गणेश नाईक सध्या माकड चाळे करत आहेत. त्यांनी हे थांबवावे,” अशा बोचऱ्या शब्दांत महाजन यांनी नाईकांना सुनावलं. दुसऱ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न केल्याने स्वतःची उंची वाढत नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. यापूर्वी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेळ्या सोडण्याच्या नाईकांच्या अजब वक्तव्याचीही त्यांनी आवर्जून आठवण करून दिली. लोकप्रतिनिधींचं नाव असं डावलणाऱ्या पालिका आयुक्तांना थेट नोटीस बजावली पाहिजे, अशी स्पष्ट मागणी महाजन यांनी केली आहे.

दुसरीकडे, राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी वेग घेतला आहे. रविवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीला केवळ ५ खासदार प्रत्यक्ष हजर होते. त्यातच खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळालं. या घडामोडींवर बोलताना महाजन यांनी, “डॉक्टरांच्या मनात आलं की योग्य वेळी ऑपरेशन होणार,” असं अत्यंत सूचक विधान केलं आहे.

या सगळ्या राजकीय गदारोळात शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाची दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंची शिवसेना मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे, तर ठाकरेंची शिवसेना दरवर्षीप्रमाणे षण्मुखानंद सभागृहात मेळावा घेणार आहे. आता या वर्धापन दिनाला ठाकरेंचे उरलेले खासदार उपस्थित राहतात का आणि ‘ऑपरेशन टायगर’ खरोखरच होतं का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही