🕒 1 min read
तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) यांच्यात नेमकं काय शिजतंय, हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या कथित नात्यावरून सोशल मीडियावर अक्षरशः मोठी खळबळ उडाली आहे.
एकीकडे त्रिशाचा ‘करुप्पू’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय, तर दुसरीकडे सतत होणाऱ्या ट्रोलिंगला ती सामोरी जातेय. पण आता या सर्व चर्चांवर त्रिशाने थेट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
Trisha Krishnan Thalapathy Vijay Relationship
त्रिशाने तिच्या पाळीव श्वानाचा एक अत्यंत क्युट व्हिडीओ नुकताच शेअर केलाय. या व्हिडीओत शांत झोपलेल्या श्वानाच्या नाकावर झूम करत तिने अत्यंत सडेतोड शब्दांत लिहिलं, “माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याची किंवा नाक खुपसण्याची परवानगी फक्त या नाकालाच आहे.” हा अप्रत्यक्ष टोला कोणासाठी होता, हे आता वेगळं सांगायला नको.
विजय मुख्यमंत्री होण्याआधीपासूनच या दोघांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ४ मे रोजी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि योगायोगाने त्याच दिवशी त्रिशाचा वाढदिवसही होता. सकाळी तिरुपतीचे दर्शन घेऊन संध्याकाळी ती थेट विजय यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती.
त्यानंतर १० मे रोजी झालेल्या विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात निळ्या साडीत आलेल्या त्रिशानेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्याचे फोटो शेअर करत ‘प्रेमाचा आवाज नेहमीच मोठा असतो’ अशी पोस्ट तिने टाकली आणि राजकारण चांगलंच तापलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याचदरम्यान विजय यांची पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज करत एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधांचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. शपथविधीलाही विजय यांच्या पत्नी आणि मुलांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे या प्रकरणातील गुंता आता अधिकच वाढल्याचं चित्र आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अरे वा ! सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण; खरेदी करण्यापूर्वी आजचे नवे दर नक्की तपासा!
- ‘700 धावा काढणार…’ आधीच ठेवले होते लिहून; फोनमधील ती नोट ते मैदानावरील तुफान, वैभव सूर्यवंशीने केला खुलासा
- अंकिता वालावलकरचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला थेट नकार? सीजेपीच्या ट्रेंडवर कोकण हार्टेड गर्लचा मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












