Share

महायुतीला रामदास आठवलेंचा थेट इशारा! ‘ते’ एक ट्विट आणि राजकारणात उडाली मोठी खळबळ

विधान परिषद आणि महामंडळ वाटपावरून आरपीआयला डावलल्याने रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्हाला गृहीत धरू नका’, असा थेट इशाराच त्यांनी महायुतीला दिलाय.

Published On: 

Ramdas Athawale warning to Mahayuti leaders over Vidhan Parishad seats

🕒 1 min read

दिल्ली – राजकारणात प्रामाणिकपणाची किंमत नेहमीच मोजावी लागते का? बकरी ईदच्या मुद्द्यावर नुकताच भाजपला आरसा दाखवणाऱ्या रामदास आठवलेंनी आता थेट महायुतीच्या नेत्यांनाच मोठा अल्टीमेटम दिलाय. ‘आठवले कुठेही जाणार नाहीत, म्हणून आम्हाला कुणीही गृहीत धरू नका,’ अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपला संताप व्यक्त केलाय. विधान परिषद (Vidhan Parishad Election 2026) आणि आगामी महामंडळाच्या वाटपावरून त्यांनी ‘एक्स’वर खदखद मांडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप आणि शिवसेनेसोबत जेव्हा इतर कोणतेही नेते उभे नव्हते, त्या कठीण काळात आरपीआय खंबीरपणे पाठीशी होती. आठवलेंनी याच जुन्या दिवसांची आठवण मित्रपक्षांना करून दिली आहे.

Ramdas Athawale warning to Mahayuti

आपली आरपीआयची ताकद सोबत जोडली गेली, म्हणूनच या युतीची खऱ्या अर्थाने ‘महायुती’ झाली, असा थेट दावा त्यांनी केलाय. त्यामुळे आता सत्तेत आपला हक्क आणि सन्मान अबाधित राहिलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो आहोत. आपला पक्ष देशभरात वेगाने वाढत असल्याचं सांगत, कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.

‘मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा नेता आहे. दिलेला शब्द पाळणं हा माझा स्वभाव असल्यामुळे माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही,’ असं ते म्हणाले. पण याच प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊ नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय.

विधान परिषदेत आरपीआयला हक्काची जागा मिळायला हवी होती, अशी उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली. आता किमान महामंडळाच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या निष्ठेचा योग्य तो सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे व्यक्त केली आहे. सध्या आठवलेंच्या या ‘एक्स’ पोस्टमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. आता महायुतीचे वरिष्ठ नेते त्यांची ही नाराजी कशी दूर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!