अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यात फोनवरच राडा, …अन् सावे यांनी रागात फोन कट केला

छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत मोठा राडा झाला असून अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांच्यात फोनवरच तुफान वाद झाल्याचे समोर आले आहे.

Published On: 

Maharashtra Politics Controversy, Abdul Sattar, Atul Save

छत्रपती संभाजीनगर– सत्ता टिकवण्यासाठी एकत्र आलेले मित्रच जर जाहीरपणे एकमेकांचे वैरी बनले तर काय होईल? विधानपरिषद निवडणुकीच्या ऐन तोंडावर छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे खळबळ उडाली आहे.

महायुतीमधील दोन अत्यंत बड्या नेत्यांमध्ये थेट फोनवरच तुफान राडा झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्री अतुल सावे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील अंतर्गत वाद आता थेट चव्हाट्यावर आल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

विधानपरिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार कसरत सुरू होती. त्यातच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी पक्षाचा आदेश झुगारून थेट बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंडखोरीनंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. स्थानिक पातळीवर आमच्या शिवसेनेवर मोठा अन्याय केला जात असून पक्षाला संपवण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर आरोप सत्तार यांनी केला.

एवढ्यावरच न थांबता भाजप हे एक प्रकारे ‘स्लो पॉयझन’ आहे, असा मोठा गौप्यस्फोटही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला. त्यामुळेच महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

सतार यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, आपला राग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजिबात नसून केवळ अतुल सावे यांच्यावर आहे. गेल्या अठरा महिन्यांत आमच्या स्थानिक नगरपरिषदेला सावेंनी एक दमडीचाही विकास निधी दिलेला नाही.

या गंभीर आरोपांनंतर मंत्री अतुल सावे यांनीही आपली बाजू मांडत पलटवार केला. माझ्याकडे केवळ तांडा वस्तीचा निधी असतो आणि तो निधी देखील गेल्या संपूर्ण एका वर्षापासून शासनाकडून आलेला नाही, असे सावे यांनी सांगितले.

या वादातील सर्वात धक्कादायक माहिती अशी की, फोनवर स्वतःची बाजू मांडल्यानंतर सावे यांनी समोरच्याचे काहीही न ऐकता थेट फोन कट केला. या फोन कट करण्याच्या प्रकारामुळे सत्तार आणखीच संतप्त झाल्याची चर्चा रंगली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील हा अंतर्गत वाद आता कोणत्या थराला जाणार आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यात मध्यस्थी करणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून यामुळे नवीन समीकरणे निर्माण होऊ शकतात.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही