राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; राज्यातील १५,६३६ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय भूकंप होणार?

राज्य निवडणूक आयोगाने १५,६३६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून, १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

Published On: 

Gram Panchayat Election 2026 reservation draw schedule announced for 15636 villages in Maharashtra

मुंबई – राज्यातील स्थानिक गावपातळीवरचं राजकारण चांगलंच तापणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने एकाच फटक्यात मोठा निर्णय घेत राज्यातील हजारो गावांमध्ये एकच खळबळ उडवून दिलीय.राज्यातील तब्बल १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाच्या सोडतीचा धडक कार्यक्रम आयोगाने मंगळवारी (दि. २६) जाहीर केला आहे. सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि २०२६ या वर्षात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हा संपूर्ण कार्यक्रम राबवला जाणार आहे.

Gram Panchayat Election 2026

या मोठ्या निर्णयामुळे गावागावांत आता मोर्चेबांधणीला प्रचंड वेग आलाय. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, येत्या ८ जूनला आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची नोटीस काढली जाईल. त्यानंतर लगेचच १२ जूनला थेट विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षणाची सोडत काढण्यात येईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे सक्त आदेश आहेत. तसेच, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (OBC) एकूण जागांच्या २७ टक्क्यांपर्यंत जागा राखीव ठेवल्या जातील. एकदा का आरक्षण ठरलं की, प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप १९ जून रोजी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी १९ ते २५ जून असा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता Gram Panchayat Election 2026 ची तयारी करणाऱ्या अनेक प्रस्थापितांच्या उरात नक्कीच धडकी भरलीये.

प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी ३ जुलैपर्यंत आपले अभिप्राय देतील. या सर्व प्रक्रियेनंतर ८ जुलैला खुद्द जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेला मान्यता देतील. त्यानंतर १० जुलै रोजी या अंतिम आरक्षणाला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची मुख्य जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळेच आता ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही