उदय सामंत यांच्या पत्नीची मोठी माघार; निवडणुकीत अचानक ‘हा’ मोठा ट्विस्ट!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांनी माघार घेतली आहे. वर्षा उसगावकर यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय.

Published On: 

Neelam Shirke Withdraws: निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो, पण आता मनोरंजनाच्या आखाड्यातही भलतीच खळबळ उडाली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत अचानक नवा आणि मोठा ट्विस्ट आलाय.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के (Neelam Shirke) यांनी उमेदवारी मागे घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यांनी एका पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Neelam Shirke Withdraws

“ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याविरोधात निवडणूक लढवून महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही,” असा मोठा खुलासा त्यांनी या प्रसिद्ध केलेल्या पत्रात केला आहे. विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि आनंद काळे यांच्या आग्रहाखातर आपण लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचं नीलम यांनी सांगितलं.

सुरुवातीला वर्षा उसगावकर निवडणूक लढवणार नाहीत, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र, स्वतःचा अर्ज भरल्यानंतर सायंकाळी ऐनवेळी वर्षा उसगावकर रिंगणात असल्याची माहिती नीलम यांना मिळाली आणि चित्रच पालटलं.

या Chitrapat Mahamandal Election च्या पार्श्वभूमीवर काही मंडळींनी सोशल मीडियावरून चिखलफेक सुरू केल्याचं शल्य नीलम यांनी व्यक्त केलं. “मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी नाही, तर गेल्या २५ वर्षांपासून रंगभूमीवर श्रद्धा ठेवून सेवा करणारी केवळ एक महिला कलाकार आहे,” असं त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.

मेघराज राजे भोसले, वर्षा उसगावकर आणि इतर ज्येष्ठ रंगकर्मींशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान राखत नीलम यांनी वर्षा उसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

आज कार्यालयीन प्रक्रियेत त्या अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. या अचानक घेतलेल्या माघारीमुळे आता निवडणुकीतील पडद्यामागच्या घडामोडी अधिकच तापल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही