Share

पावसाचा अंदाज, खरीप हंगामावर ‘एल निनो’चं सावट; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर!

खरीप हंगामावर एल निनोचे संकट असून राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ८८ टक्के पाऊस पडणार असल्याचा मोठा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Published On: 

Maharashtra Weather Update: पावसाचा अंदाज, मुख्यमंत्र्यांचा इशारा!

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला कायमच बसतो आणि यंदाही याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगाम (Maharashtra Weather) अगदी तोंडावर आला असतानाच आता शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आलीये.

यंदाच्या मान्सूनवर एल निनोचं (El Nino) मोठं संकट असल्याचा धक्कादायक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.

Maharashtra Weather Update

हवामान खात्याच्या (Weather Department) अंदाजानुसार, राज्यात यंदा पावसाची सरासरी केवळ ८८ टक्के राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या एल निनोचा सर्वाधिक फटका बसू शकतो, असा थेट इशाराच सरकारने दिलाय. त्यामुळे आता पेरणीचं नियोजन कसं करायचं, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.

यंदाच्या पावसाचा पॅटर्न उतरत्या क्रमाने असणार आहे. म्हणजेच, जून महिन्यात चांगला पाऊस होईल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू घटत जाईल. सर्वात चिंतेची बाब म्हणजे पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर असणार आहे. यामुळे पिकांवर मोठा ताण येऊ शकतो.

या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ची कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. याआधी २०१५ साली एल निनोमुळे राज्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यावेळी मराठवाड्यात तब्बल ३९ टक्के पावसाची तूट (फक्त ६१ टक्के पाऊस) नोंदवली गेली होती.

तशी दुष्काळी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास काय करायचं, यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आतापासूनच ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या कडक सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install