🕒 1 min read
प्रेमात नकार दिला म्हणून थेट जीवच घेतला जाईल, याचा विचारही करवत नाही. पण, पंजाबच्या मनोरंजन विश्वातून अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध Punjabi Singer Inder Kaur हिचा लुधियाना जवळील नीलो कालव्यात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी या गुणी गायिकेचा (Inder Kaur Murder) असा दुर्दैवी अंत होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंदरला चक्क गन पॉईंटवर किडनॅप करण्यात आलं होतं, असा अत्यंत गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Inder Kaur Murder
कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, इंदरची तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवरून एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. पण तो व्यक्ती आधीच विवाहित आणि मुलांचा बाप असल्याचं समजल्याने इंदरने त्याला स्पष्ट नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने तिचं अपहरण केलं आणि हत्या करून तो थेट कॅनडाला पळून गेला! तो खास या कटासाठी नेपाळमार्गे भारतात आल्याचंही बोललं जात आहे.
सध्या पोलिसांनी इंदरचा मृतदेह समराला येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांच्या अधिकृत पुष्टीनंतर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच या प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडतील.
मात्र, या सगळ्यात इंदरच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टचं गूढ चांगलंच वाढलं आहे. इंदरचं ६ दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं, तर मग ५ दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो कसा पोस्ट झाला? हा प्रश्न आता चाहत्यांना सतावतोय. ती पोस्ट आधीच शेड्युल केली होती की यात आणखी काही काळंबेरं आहे? यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ‘जट्ट माइंड’, ‘देसी सिरे दा’ आणि ‘किसान एंथम २’ सारख्या हिट गाण्यांनी प्रसिद्धी मिळवणाऱ्या या गायिकेच्या जाण्याने चाहते प्रचंड धक्क्यात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोविंदाचा तुटलेला दात अन् व्हायरल व्हिडीओ; चाहत्यांचा धक्कादायक संशय, म्हणाले “बायकोनेच…”
- प्राजक्ताचं नऊवारी साडीत खुललं सौंदर्य; म्हणतेय, ‘काही लिहायची गरज?’
- Maharashtra Monsoon Alert : मान्सूनची दमदार एन्ट्री! १० राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस कधी धडकणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












