Share

मुख्यमंत्री थलपती विजयला स्टॅलिन यांचा मोठा धक्का; तृषा कृष्णनला दिली १२ कोटींची ऑफर, नेमकं चाललंय काय?

मुख्यमंत्री थलपती विजय यांचे राजकीय विरोधक उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णनला एका सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

Published On: 

Trisha Krishnan: 'त्या' शब्दाने खळबळ!

राजकारणात आणि सिनेसृष्टीत कधी कोणता नवा ट्विस्ट येईल, याचा काहीच नेम नसतो. याचाच प्रत्यय आता तमिळनाडूत पुन्हा एकदा आलाय. एकीकडे तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय (CM Thalapathy Vijay) आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोटाचा वाद सुरू असतानाच, आता अभिनेत्री तृषा कृष्णन (Trisha Krishnan) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलीय.

विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात पारंपरिक लूकमध्ये हजेरी लावणारी तृषा सर्वांच्याच डोळ्यांत भरली होती. दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता सूत्रांनुसार एक मोठी माहिती समोर आली आहे.

Trisha Krishnan Stalin

विजय यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि ‘डीएमके’चे प्रमुख नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी थेट तृषा कृष्णनला एका मोठ्या सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची भलीमोठी ऑफर दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्टॅलिन एका बिग बजेट सिनेमाची निर्मिती करत असून, त्यात मुख्य भूमिकेसाठी तृषाला विचारण्यात आलंय. विशेष म्हणजे, अलीकडेच तृषाने तिच्या मानधनात मोठी वाढ केली असून, ती आता एका सिनेमासाठी १० ते १२ कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे. ‘लिओ’ आणि ‘पोनियिन सेल्वन’च्या यशानंतर तिचा भाव चांगलाच वधारलाय.

आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, तृषा ही ऑफर स्वीकारणार का? अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण विजय आणि स्टॅलिन यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असताना, स्टॅलिन यांनी थेट विजय यांच्या जवळच्या मैत्रिणीलाच आपल्या प्रोजेक्टसाठी विचारल्याने तमिळ सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

सध्या तमिळनाडूत या एकाच बातमीने राजकारण चांगलंच तापलं आहे. तृषाने या प्रस्तावाला होकार दिल्यास, यामागे केवळ सिनेमा नसून एखादी मोठी राजकीय खेळी असू शकते, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही