Share

ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, भारत-अमेरिका व्यापार करारात विघ्न; नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे भारत-अमेरिका व्यापार करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टॅरिफ चौकशीमुळे या कराराची प्रक्रिया आता काही महिने रखडण्याची शक्यता आहे.

Published On: 

India US Trade Deal Donald Trump tariff investigation on India

India US Trade Deal: डोनाल्ड ट्रम्प नेमका कोणता निर्णय घेतील, याचा कुणालाच अंदाज बांधता येत नाही. आता त्यांनी घेतलेल्या एका नव्या निर्णयामुळे जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुचर्चित व्यापार करारात आता मोठा खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने थेट १६ व्यापारी भागीदारांची चौकशी करून त्यांच्यावर टॅरिफ लादण्याचे कडक संकेत दिले आहेत, ज्यात भारताचाही समावेश आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने चार भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या या नव्या भूमिकेमुळे India US Trade Deal ची प्रक्रिया आता आणखी काही महिने लांबणीवर पडू शकते.

India US Trade Deal मध्ये Donald Trump यांच्या निर्णयाने खळबळ

खरंतर, मार्च महिन्यात या महत्त्वाच्या अंतरिम करारावर स्वाक्षरी होणं अपेक्षित होतं. त्यानंतर अंतिम करारावर शिक्कामोर्तब झालं असतं. स्वतः ट्रम्प यांनी फेब्रुवारीतच या व्यापार कराराची मोठी घोषणा केली होती.

त्यामुळेच, रशियाकडून तेल खरेदी केल्याप्रकरणी भारतावर लादलेला २५ टक्के दंडात्मक टॅरिफ अमेरिकेने तातडीने रद्द केला होता. असं असलं तरी, आता अमेरिकेने पुन्हा एकदा नव्या चौकशीचा बडगा उगारल्याने दोन्ही देशांत नवे मतभेद निर्माण झाले आहेत.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारताला आपला दिलेला शब्द पाळण्याचं थेट आव्हान दिलं आहे. दुसरीकडे, भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र या करारात कोणताही अडथळा येणार नसल्याचा दावा केला आहे. व्हाईट हाऊसनेही या करारावर काम सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अमेरिका व्यापार करारासाठी भारतावर दबावतंत्राचा वापर करत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. आता अमेरिकेच्या बदलत्या टॅरिफ धोरणांमुळे भारताने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मात्र यावर स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ज्या देशांसोबत करार झाले आहेत, त्यांनी ते पूर्ण करावेत, अशी थेट अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याने राजकारण तापलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install