पाणी जसं जपून वापरता, तसाच आता गॅसही वापरा! जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाने मोठी खळबळ

इराण-इस्रायल संघर्षामुळे राज्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईप्रमाणेच नागरिकांनी गॅसही जपून वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Published On: 

LPG Gas Saving Appeal by Chhatrapati Sambhajinagar Collector Dilip Swami

LPG Gas : अचानक घरातील गॅस संपला आणि बाहेरून मिळण्याची कोणतीही सोय नसली तर काय होईल? या कल्पनेनेच सध्या सामान्यांच्या मनात मोठी धाकधूक वाढली आहे.

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी घरगुती गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

वाढत्या टंचाईमुळे प्रशासनाचे LPG Gas Saving Appeal

या भयानक परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी थेट जनतेलाच साद घातली आहे. पाणीटंचाईच्या काळात आपण जसं थेंब थेंब पाणी जपतो, अगदी तसाच गॅसही आता काटकसरीने वापरा, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

सध्या परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत प्रत्येकानेच गॅसचा काटेकोर वापर करणं गरजेचं आहे. असं असलं तरी, नागरिकांनी अजिबात पॅनिक होऊ नये, असं प्रशासनानं वारंवार स्पष्ट केलं आहे. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तब्बल ११ विशेष पथकं गॅस एजन्सींची कसून तपासणी करत आहेत.

दुसरीकडे, या गॅस टंचाईचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये शूटिंगदरम्यान चपातीऐवजी चक्क पाव देण्याची वेळ आली आहे. तर धुळ्यात मंगल कार्यालय चालकांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून, गॅस न मिळाल्यास नियोजित विवाह सोहळे पुढे ढकलण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील मंदिरं आणि गुरुद्वारांमधील अन्नछत्रांवरही या टंचाईचे गडद सावट पडले आहे. गॅस अभावी सध्या हजारो गरजूंना केवळ वरण-भात दिला जात असून चपात्या बनवणं तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. त्यामुळेच लवकरात लवकर ही टंचाई संपावी, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही