गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले

गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.

Published On: 

LPG Cylinder Booking | LPG Cylinder Booking WhatsApp SMS Missed Call Methods |

LPG Cylinder Booking- पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धाचे चटके आता थेट सर्वसामान्य भारतीयांच्या स्वयंपाकघराला बसू लागले आहेत. गॅस टंचाईच्या अफवांमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून, काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने आता एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात मोठे बदल केले आहेत. या नव्या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी गॅस ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी थेट संसदेतच या नव्या नियमांची सविस्तर माहिती दिली.

LPG Cylinder Booking Rule: शहरी आणि ग्रामीण भागासाठी नवे नियम

नव्या [LPG Cylinder Booking Rule] नुसार, आता ग्रामीण भागातील ग्राहकांना दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये तब्बल 45 दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे. तर, शहरी भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी 25 दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे.

त्यामुळेच, आता ग्राहकांना हवं तेव्हा घाईघाईत गॅस बुकिंग करता येणार नाही. याआधी देशभरात बुकिंगसाठी 21 दिवसांचा नियम होता, जो नंतर 25 दिवसांवर गेला होता. आता मात्र ग्रामीण आणि शहरी भागासाठी सरकारने दुजाभाव करत वेगवेगळे नियम लागू केले आहेत.

असं असलं तरी, गॅस टंचाईच्या निव्वळ अफवा असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. लोक घाबरून 55 दिवसांऐवजी थेट 15 दिवसांतच गॅस बुक करत सुटले होते. यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी वाढल्यानेच बुकिंगमधील अंतर वाढवल्याचा दावा सरकारने केला आहे.

संसदेत बोलताना मंत्री हरदीप पुरी यांनी देशात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याची ग्वाही दिली. कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या पाच दिवसांत गॅस उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ केल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गॅस टंचाईमुळे रेस्टॉरंट्स बंद पडत असल्याचा मुद्दा लोकसभेत उचलून धरला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र, सरकारने देशात गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा पुनरुच्चार करत विरोधकांचे दावे फेटाळून लावले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही