Maharashtra Kesari : पुण्यात पुन्हा शड्डू घुमणार; ६८ व्या केसरीचा थरार ‘या’ तारखेला!

यंदाची ६८ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यातल्या वाघोलीत होणार आहे. १८ ते २२ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या थरारात ८४० मल्ल सहभागी होतील.

Published On: 

Maharashtra Kesari 2026: पुण्यात कुस्तीचा थरार!

महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि लाल मातीतला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती! दरवर्षीप्रमाणे यंदाही हा थरार कुठे रंगणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर कुस्तीप्रेमींची ही प्रतीक्षा संपली असून, कुस्तीगीर परिषदेने मोठी घोषणा केली आहे. यंदाचा ६८ वा महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari 2026) आखाडा पुण्याच्या मातीत गाजणार आहे!

पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. १८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत हा कुस्तीचा महाकुंभ भरले. पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा पुणेकरांना घरच्या मैदानावर कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

Maharashtra Kesari 2026

या स्पर्धेची व्याप्ती प्रचंड असणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील ४२ शहरांतून तब्बल ८४० कुस्तीगीर आपले नशीब आजमावण्यासाठी आखाड्यात उतरतील. माती आणि गादी (मॅट) अशा दोन्ही विभागांत वरिष्ठ गटातील लढती होतील. विजेत्या पैलवानाला कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ १ किलो चांदीची मानाची गदा देऊन गौरवण्यात येईल.

कुस्ती ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. १९६१ मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. ग्रामीण भागातील मल्लांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा यंदा वाघोलीत काय नवा इतिहास घडवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही