Share

सोने-चांदी खरेदीदारांना मोठा झटका; दरात विक्रमी उसळी, १० ग्रॅमचे नवे दर पाहून उडेल झोप!

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, १० ग्रॅम सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

Published On: 

Gold Rate drop trend and stacked gold coins on trading screen

लग्नसराईच्या तोंडावर सोनं-चांदी (Gold Rate Today) खरेदी करण्याचा विचार करताय? तर जरा थांबा! कारण आज सराफा बाजारात जे घडलंय, ते ऐकून तुमच्या खिशाला मोठी कात्री लागल्याशिवाय राहणार नाही.

सकाळपासूनच कमोडिटी बाजारात (MCX) मोठी खळबळ उडाली आहे. चांदीच्या दराने तर आज थेट रेकॉर्डच मोडला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एमसीएक्सवर चांदीत प्रति किलो तब्बल ६,४८८ रुपयांची विक्रमी वाढ झाली. आता एक किलो चांदीसाठी तब्बल २ लाख ४२ हजार ९२३ रुपये मोजावे लागणार आहेत.

Gold Silver Rate Today

दुसरीकडे सोन्यानेही ग्राहकांना चांगलाच घाम फोडला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate Today) आज सकाळी प्रति १० ग्रॅम १,६३९ रुपयांची भक्कम वाढ नोंदवली गेली. या नव्या तेजीमुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव आता १ लाख ५४ हजार ४७५ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. हा दर आता दीड लाखांच्या पुढे गेल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात लपाछपीचा खेळ सुरू आहे. त्यातच स्थानिक सराफा बाजारात या मूळ किमतींवर ज्वेलर्सचे मेकिंग चार्जेस आणि कर (GST) लागणार असल्याने, ग्राहकांना दुहेरी भुर्दंड बसणार आहे. वाढत्या महागाईच्या आलेखामुळे आता सोनं आणि चांदी खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याची चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install