Share

आधी पाकिस्तानी खेळाडूंना मिठी, मग हस्तांदोलन; इरफान पठाणच्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी भडकले?

इरफान पठाणने जेद्दाहमध्ये पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकला मिठी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर या कृतीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

Published On: 

Irfan Pathan Viral Video: इरफानने पाकिस्तानी खेळाडूला मारली मिठी; व्हिडिओमुळे खळबळ!

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना क्रिकेटच्या मैदानात ‘दोस्ती’ शोभते का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निमित्त ठरलाय तो भारताचा माजी स्टार अष्टपैलू इरफान पठाणचा एक व्हिडीओ. सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये झालेल्या एका सामन्यात इरफानने चक्क पाकिस्तानी खेळाडूला मिठी मारल्याने एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Irfan Pathan & Shoaib Malik Viral Video

गेल्या काही काळापासून दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून टीम इंडियाचे सध्याचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी मैदानात अंतर राखून असतात. पण २२ जानेवारीला जेद्दाहमध्ये घडलेला प्रकार याच्या अगदी उलट होता. ‘वर्ल्ड क्रिकेट फेस्टिव्हल’ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये एक डबल विकेट सामना झाला. सामना संपताच भारताकडून खेळणारा इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकशी केवळ हस्तांदोलनच केलं नाही, तर त्याला चक्क मिठी मारली. हा इरफान पठाणचा विडिओ (Irfan Pathan Viral Video) समोर येताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

काही महिन्यांपूर्वीच टीम इंडियाचा टी-२० कॅप्टन सूर्यकुमार यादवने आशिया कपमध्ये टॉसच्या वेळी पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याही आधी एप्रिलमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी इंग्लंडमधील नियोजित सामन्यावर बहिष्कार टाकला होता. ‘जेव्हा आपले जवान सीमेवर लढतायत, तेव्हा आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळू शकत नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

असं असताना इरफान आणि बिन्नीने मात्र जुन्या मैत्रीला जागत मैदानात ‘भाईचारा’ दाखवला. सामन्यात पाकिस्तानने ५६ धावा केल्या होत्या, तर भारताला ५१ धावाच करता आल्या. इरफानने एकट्याने झुंज देत ४९ धावा कुटल्या, पण बिन्नीला खातंही उघडता आलं नाही. भारताचा ५ धावांनी पराभव झाला. पण या निकालापेक्षा इरफानच्या त्या मिठीचीच चर्चा जास्त रंगली आहे. विशेष म्हणजे, या सामन्यानंतर पाकिस्तानी सोशल मीडिया युजर्सनीही इरफान पठाणला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता यावर इरफान काय स्पष्टीकरण देणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही