Share

ग्राहकांसाठी मोठी बातमी; सलग ४ दिवस बँका बंद राहणार? १० लाख कर्मचारी संपावर!

Over 10 lakh bank employees to go on strike on January 27 demanding a 5-day work week, causing a potential 4-day banking closure.

Published On: 

Bank Strike News: बँका सलग ४ दिवस बंद राहणार? १० लाख कर्मचारी संपावर!

तुम्ही अजून एटीएममधून (ATM) पैसे काढले नसतील, तर आताच काढून ठेवा. कारण पुढचे काही दिवस तुमची मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. “बँकेत आमचं महत्त्वाचं काम आहे”, असं म्हणून तुम्ही जर सोमवारी बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर हा प्लान रद्द करा. कारण देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून सरकारसोबतची चर्चा सपशेल फिस्कटली आहे.

Bank Strike News

बँक कर्मचाऱ्यांची ‘पाच दिवसांचा आठवडा’ (5-day work week) ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी सरकारने ही मागणी मान्य केली होती, पण त्याची अंमलबजावणी काही झाली नाही. याच मुद्द्यावरून आज कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये बैठक झाली, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे आता १० लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी २७ जानेवारीला लाक्षणिक संपावर जात आहेत.

योगायोगाने सुट्ट्यांचा असा काही योग जुळून आलाय की सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. २४ आणि २५ जानेवारीला शनिवार-रविवारच्या सुट्ट्या आहेत, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे आणि लगेच २७ तारखेला हा Bank Strike असल्याने बँकांचे कामकाज सलग ४ दिवस ठप्प राहण्याची भीती आहे.

याबाबत बोलताना बँक कर्मचारी संघटनेचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणतात, “आरबीआय (RBI), एलआयसी आणि नाबार्डमध्ये ५ दिवसांचा आठवडा आहे, मग आम्ही काय घोडं मारलंय? सरकार फक्त आश्वासन देतंय, अंमलबजावणी करत नाही.”

तुळजापूरकर यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही ग्राहकांची माफी मागतो, पण सरकारच्या आडमुठेपणामुळे आमचा नाईलाज झाला आहे.” त्यामुळे आता २७ तारखेला होणाऱ्या या संपाचा फटका कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांना बसणार, हे नक्की.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install