Share

‘मी हिरो झालो असतो, पण…’; अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, ‘या’ ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी आली होती ऑफर!

अमित ठाकरेंना अभिनयाची ऑफर होती, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. महेश मांजरेकरांच्या एका गाजलेल्या सिनेमासाठी त्यांना विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी राजकारणासाठी ती नाकारली.

Published On: 

Amit Thackeray Movie Offer: महेश मांजरेकरांचा 'तो' सिनेमा!

मुंबई – राजकारणात एन्ट्री करण्यापूर्वी कोणाचं काय स्वप्न होतं, हे ऐकल्यावर अनेकदा धक्का बसतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे ब्रँड’ची चर्चा असतानाच आता मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी एक असा खुलासा केलाय की, ऐकणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे आणि सिनेमा यांचं जुनं नातं आहे, पण अमित ठाकरेंना चक्क एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर आली होती, हे तुम्हाला माहितीय का?

सध्या महापालिका निवडणुकांचा (BMC Election 2026) धुरळा उडतोय आणि अमित ठाकरे प्रचारात सक्रिय आहेत. अशातच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या ‘कॅमेरा प्रेम’ आणि ‘फुटबॉल’ आवडीबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी अमित यांना एका चित्रपटात काम करण्यासाठी विचारलं होतं.

Amit Thackeray and Mahesh Manjrekar

अमित ठाकरेंनी सांगितलं की, त्यांना २०२५ मध्ये गाजलेल्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Punha Shivajiraje Bhosale) या चित्रपटासाठी ऑफर आली होती. “महेश सर मला या चित्रपटात घेण्यासाठी आग्रही होते,” असं अमित म्हणाले. मात्र, अमित यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली.

यावर बोलताना अमित म्हणाले, “मला कॅमेराच्या मागे म्हणजेच दिग्दर्शनात (Direction) जास्त रस होता. किंवा मला स्पोर्ट्समध्ये, विशेषतः फुटबॉलमध्ये करिअर करायचं होतं. पण २०१४ नंतर मला जाणवलं की राजकारण हे पार्ट-टाइम काम नाही. ते पूर्णवेळ करण्याची गोष्ट आहे, म्हणून मी सिनेमाऐवजी राजकारणाची निवड केली.”

अमित यांनी नकार दिल्यानंतर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात पुढे अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) याने काम केले आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. जर अमित ठाकरेंनी होकार दिला असता, तर आज ते राजकारणाच्या मैदानात दिसले असते की मोठ्या पडद्यावर, हा विचार करून चाहतेही अवाक झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही