🕒 1 min read
मुंबई – राजकारणात सख्खे भाऊ पक्के वैरी होतात आणि कट्टर वैरी गळ्यात गळे घालतात, हे आपण अनेकदा पाहिलंय. पण अकोल्यात जे घडलं होतं, त्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. हिंदुत्वाचा नारा देणारा भाजप आणि एमआयएम (BJP-MIM Alliance) एकत्र आले होते. पण आता या ‘अनोख्या’ मैत्रीला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त करताच अकोल्यातील स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले असून अवघ्या काही तासांत चित्र पालटलं आहे.
नेमकं काय घडलं?
अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंच’ स्थापन करण्यात आला होता. विशेष म्हणजे यात एमआयएमचे ५ नगरसेवकही सामील झाले होते. मात्र, हे वृत्त (BJP-MIM Alliance) वाऱ्यासारखे पसरताच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली. देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचा इशारा देताच एमआयएमने अधिकृतपणे या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी याबाबतचे पत्र दिले असून, रेश्मा परवीन, युसुफ खान यांच्यासह पाचही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठिंबा काढल्याचे पत्र दिले आहे.
BJP-MIM Alliance Break
फक्त युती तुटली नाही, तर पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला गेलाय. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. “पक्षाची प्रतिमा मलिन झाली, आता तुमच्यावर कारवाई का करू नये?” असा सडेतोड जाब वरिष्ठांनी विचारल्याने स्थानिक नेत्यांची पळापळ झाली आहे.
अंबरनाथमध्येही भाजपला काँग्रेसने समर्थन दिल्याची चर्चा होती. तिथेही भाजप नेते नरेंद्र पवार यांनी “पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे,” अशी सारवासारव केली आहे. एकूणच काय, तर सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांनी चांगलाच चाप लावला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संभाजीनगरात मोठा राडा! भररस्त्यात इम्तियाज जलीलयांच्या गाडीवर हल्ला; जिन्सीमध्ये तणाव
- बावनकुळेंनी हद्दच केली! महापुरुषांच्या समोर ‘अश्लील’ डान्स, वरून म्हणाले – “हा तर महिलांचा आनंद!”
- Heart Health: जिम नको, कडक डाएट नको; दिवसाला फक्त ‘इतकी’ पावलं चाला, हार्ट अटॅकचा धोका होईल छुमंतर!
- ऑनलाईन फ्रॉड झालाय? रडू नका, तात्काळ हे काम करा; गेलेले पैसे परत मिळण्याची मोठी संधी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












