Share

“देवेंद्र फडणवीस, जरा तरी लाज बाळगा!”; नवनाथ बन यांच्यासाठी अपक्षाचे अपहरण? “मर्डर करवा, पण…”

Congress attacks CM Devendra Fadnavis, alleging police abducted an independent candidate to favor BJP’s Navnath Ban.

Published On: 

Congress attacks CM Devendra Fadnavis, alleging police abducted an independent candidate to favor BJP's Navnath Ban; viral video shows candidate refusing to withdraw despite threats.

🕒 1 min read

मुंबई – निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत राजकीय राडा सुरू झाला आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना दाबण्याचे प्रकार नवीन नाहीत, पण मानखुर्दमध्ये जे घडलंय ते लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. भाजपचे उमेदवार नवनाथ बन (Navnath Ban) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी एका अपक्ष उमेदवाराचे चक्क पोलिसांमार्फत अपहरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकारानंतर काँग्रेसने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका करत, “फडणवीस साहेब, जरा तरी लाज बाळगा!” अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

“रात्री १२ वाजता पोलीस घरी आले…”

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अपक्ष उमेदवार लालू भाई वर्मा (Lalu Bhai Verma) हे भाजप नेत्यांसमोर संतापाने ओरडताना दिसत आहेत. वर्मा यांच्या दाव्यानुसार, “रात्री १२ वाजता पोलिसांनी मला घरातून उचलले. रात्रभर माझे दरवाजे वाजवले गेले.” विशेष म्हणजे, उमेदवारी मागे घेतली नाही तर “माझ्या गाडीत चरस-गांजा ठेवून मला खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप वर्मा यांनी केला आहे.

“मर्डर करवा, पण माघार नाही”

व्हिडिओमध्ये लालू भाई वर्मा यांचा आक्रमक अवतार पाहून उपस्थित Navnath Ban आणि भाजप कार्यकर्तेही अवाक झाले. वर्मा यांनी थेट किरीट सोमैया आणि मनोज कोटक यांची नावे घेत आरोप केले आहेत. “तुम्ही मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन धमकावताय? मग माझा मर्डरच करवा, माझ्या मुलांना संपवा, पण मी माघार घेणार नाही,” असा पवित्रा वर्मा यांनी घेतला आहे. “मला मुंबईत धंदा करू देणार नाही, अशी धमकी दिली जातेय,” असेही ते व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

Congress slams Devendra Fadnavis over Navnath Ban

काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्ला

या घटनेनंतर महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, “नवनाथ बन यांच्यासाठी भाजप नेत्यांनी आधी अपक्ष उमेदवाराला धमकावले आणि नंतर पोलिसांनी त्याचे अपहरण केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), गृहमंत्री म्हणून जरा तरी लाज बाळगा.” भर निवडणुकीत पोलिसांचा असा वापर होत असल्याने मुंबईतले वातावरण चांगलेच तापले आहे. आता यावर फडणवीस काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही