‘बॉर्डर 2’ मध्ये वरुण धवनची हिरोईन कोण? तिच्या घरात ३ पिढ्यांनी घातलीये वर्दी; सत्य जाणून कराल सलाम!

Debutant actress Medha Rana to star opposite Varun Dhawan in ‘Border 2’. She comes from a military family with 3 generations serving the nation.

Published On: 

Debutant actress Medha Rana to star opposite Varun Dhawan in 'Border 2'. She comes from a military family with 3 generations serving the nation.

मुंबई – २७ वर्षांपूर्वी ‘बॉर्डर’ चित्रपटाने जो इतिहास रचला, त्याची पुनरावृत्ती करायला आता ‘बॉर्डर 2’ सज्ज झालाय. सनी पाजींची डरकाळी आणि तोफेचा आवाज पुन्हा एकदा थिएटरमध्ये घुमणार आहे. पण या सगळ्या गदारोळात आणि स्टारकास्टच्या गर्दीत एका नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मेधा राणा (Medha Rana) आहे. विशेष म्हणजे, ती फक्त पडद्यावर फौजीची पत्नी किंवा प्रेयसी साकारत नाहीये, तर खऱ्या आयुष्यातही तिच्या रक्तातच देशसेवा भिनलेली आहे.

येत्या २३ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या भव्य चित्रपटात मेधा अभिनेता वरुण धवनसोबत (Varun Dhawan) स्क्रीन शेअर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण आणि मेधा यांच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे, पण पडद्यावर त्यांची केमिस्ट्री कशी जुळतेय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांसारखे दिग्गज असतानाही मेधाच्या नावाची चर्चा होतेय.

Border 2 Actress Medha Rana

मेधाची या चित्रपटासाठी झालेली निवड योगायोग नाही. मेधा एका अशा कुटुंबातून येते जिथे गेल्या तीन पिढ्यांनी भारतीय लष्करात (Armed Forces) सेवा बजावली आहे. तिचे आजोबा, काका आणि स्वतः वडील सुनील राणा हे लष्करात अधिकारी होते. त्यामुळे ‘बॉर्डर’ सारख्या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी फक्त करियर नाही, तर एक इमोशनल प्रवास आहे.

नुकतंच मेधाने ‘घर कब आओगे’ या गाण्याबद्दल एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली, जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. ती म्हणते, “हा प्रोजेक्ट माझ्यासाठी त्या सर्व वीर जवानांना आणि गणवेशातील पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या घरातील स्त्रियांना श्रद्धांजली आहे.”

गुडगावमध्ये जन्मलेली आणि ‘आर्मी किड’ म्हणून देशभरातील आर्मी स्कूल्समध्ये शिकलेली मेधा आता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही