Share

मुंबईकरांनो, आज-उद्या हाल होणार! पश्चिम रेल्वेच्या 215 लोकल फेऱ्या रद्द; नेमकं कारण काय?

Major disruption on Western Railway as 215 local trains stand cancelled over two days due to construction work.

Published On: 

Major disruption on Western Railway as 215 local trains stand cancelled over two days due to construction work.

मुंबई– मुंबईकरांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. लोकलच्या ( Mumbai Local  ) गर्दीतून वाट काढणं हे आधीच एक दिव्य असतं, त्यात आता रेल्वे प्रशासनाने दिलेल्या एका अपडेटमुळे चाकरमान्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. जर तुम्ही मंगळवारी किंवा बुधवारी पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असाल, तर थोडा वेळ काढून हे आधी नक्की वाचा, कारण तुमचं वेळापत्रक कोलमडण्याची दाट शक्यता आहे.

नेमकं काय घडलंय?

कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आलं असलं तरी, त्यासाठी ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेत बदल करणे अनिवार्य आहे. याच कामासाठी पश्चिम रेल्वेने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस मोठा ‘मेगाब्लॉक’ जाहीर केला आहे. या दोन दिवसांत पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रात्रीच्या प्रवाशांना मोठा फटका

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर दुसरीकडे, रात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर शुकशुकाट असेल. याचा परिणाम असा होईल की, मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारे 93 लोकल फेऱ्या रद्द राहतील. इतकेच नाही तर, बुधवारी दिवसभरातही प्रवाशांना दिलासा मिळणार नाही, कारण त्या दिवशी 122 लोकल ( Mumbai Local  ) फेऱ्या धावणार नाहीत.

प्रवाशांनी काय करावं?

सहावा मार्ग पूर्ण झाल्यावर प्रवाशांना नक्कीच फायदा होईल, असा दावा रेल्वेने केला आहे. पण सध्या तरी हा ‘ब्लॉक’ प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरणार आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये (Peak Hours) स्थानकांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं लाईव्ह स्टेटस तपासावं आणि शक्य असल्यास रस्तेमार्गाचा किंवा मेट्रोचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. थोडक्यात काय, तर पुढचे ४८ तास मुंबईकरांसाठी ‘मेगा’ त्रासाचे ठरू शकतात.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install