Share

“हॅलो आका, व्यवस्था करा…”; पुण्यातल्या ‘त्या’ गुंडावरून काँग्रेसचे ‘मीम वॉर’! भाजपच्या बड्या नेत्याला केले टार्गेट

Congress targets BJP with a viral meme captioned “Godfather who helps gangsters escape.

Published On: 

Congress targets BJP (Murlidhar Mohol ) with a viral meme captioned "Godfather who helps gangsters Nilesh Ghaiwal escape''

पुणे – पुण्याच्या राजकारणात गुन्हेगार आणि नेत्यांचे संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, पण यावेळी काँग्रेसने शेअर केलेल्या एका व्यंगचित्राने (Meme) सोशल मीडियावर अक्षरशः धुरळा उडवला आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याला पळून जाण्यास कोणी मदत केली, यावरून आपल्याच महायुतीतील नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. दादांच्या या वक्तव्याचा धागा पकडत आता काँग्रेसने भाजपच्या ‘त्या’ बड्या नेत्याचे कान टोचले आहेत.

Congress targets BJP Murlidhar Mohol

नेमकं काय आहे या मीममध्ये?

महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. यात एक व्यक्ती फोनवर बोलताना दिसतेय आणि समोरच्याला म्हणतेय, “हॅलो आका, व्यवस्था करा आपली.” त्यावर समोरून, “हम करते है प्रबंध, आप चिंता मत करिये,” असं उत्तर येतं आणि ती व्यक्ती विमानाने उडून जाताना दिसते. या चित्राखाली “गुंडांना विदेशात पळायला मदत करणारा आका!” अशी खोचक कॅप्शन देण्यात आली आहे.

पुण्यात गुन्हेगारी वाढल्याच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडे बोट दाखवलं होतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. “घायवळला कोणी पळवून लावलं हे आम्हाला माहितीय,” असा सूचक इशारा दादांनी दिला होता.

महायुतीमधील या अंतर्गत कलहाचा फायदा घेत काँग्रेसने आता थेट भाजपलाच घेरलं आहे. या मीममध्ये कोणाचंही नाव नसलं, तरी त्यात दाखवलेली वेशभूषा आणि संवाद कोणाकडे अंगुलीनिर्देश करतोय, हे समजायला पुणेकरांना वेळ लागलेला नाही. ‘आका’ आणि ‘विमान’ या प्रतिकांचा वापर करून काँग्रेसने भाजपच्या ‘त्या’ नेत्याची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या ‘मीम वॉर’ला भाजप कसं उत्तर देणार, हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही