Share

“पैसे नसतील तर घरात येऊ नको”; सासऱ्याने बेल्टने फोडलं, नवऱ्याने तुडवलं! पुण्यातला ‘हा’ प्रकार ऐकून संतापाल!

A married woman was brutally beaten with a belt by her father-in-law over dowry demands.

Published On: 

Shocking incident in Pimpri-Chinchwad: A married woman was brutally beaten with a belt by her father-in-law over dowry demands.

🕒 1 min read

पुणे : Dowry News – लग्न होऊन जेमतेम महिनाही उलटला नव्हता, हातावरची मेहंदीही अजून उतरली नव्हती, तोवरच सासरच्यांनी नवविवाहितेचं आयुष्य नरक बनवलं. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी सासरच्या मंडळींनी सुनेचा अमानुष छळ तर केलाच, पण पैसे आणले नाहीत म्हणून चक्क बेल्टने फोडून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडित महिलेचा विवाह २४ नोव्हेंबर २०२४ ला झाला होता. पण संसाराची स्वप्न रंगवण्याआधीच पैशांची मागणी सुरू झाली. सासरच्यांनी शेअर मार्केटच्या तोट्याचं कारण पुढे करत ५ लाख रुपयांची मागणी केली. वडिलांकडून ३ लाख रुपये आणूनही त्यांची हाव शमली नाही. उपासमार आणि शिवीगाळ नित्याचीच झाली होती. २१ डिसेंबर २०२५ रोजी जेव्हा पीडिता सासरी परतली, तेव्हा “पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको,” असं म्हणत तिला अडवण्यात आलं.

घरात प्रवेश नाकारल्यानंतर सासरा प्रदीप याने सुनेला बेल्टने अमानुष मारहाण केली. पती राजदीपने लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, तर सासू हेमलतानेही हात साफ करून घेतले. या मारहाणीत विवाहितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात (Dapodi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

इकडे हुंड्यापायी एका विवाहितेचा जीव धोक्यात आला असतानाच, दुसरीकडे चाकणमध्ये (Chakan) एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः २७ जणांचे लचके तोडले आहेत. महात्मा फुले मार्केट यार्डात या कुत्र्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांवर हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही