अनिल परबांच्या ‘खास’ माणसाचा पत्ता कट; ठाकरेंचा मोठा ॲक्शन प्लॅन, २६ बंडखोरांची हकालपट्टी!

Shiv Sena (UBT) expels 26 rebel leaders for contesting against official candidates in BMC elections, including Anil Parab’s close aide Shekhar Wayangankar.

Published On: 

Sanjay Shirsat has offered Uddhav Thackeray group leader Chandrakant Khaire , Bandu Tagade to join his group | ShivSena UBT

मुंबई : Shivsena UBT – राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, पण ती व्यक्तीपेक्षा पक्षाशी असावी लागते. याचा विसर पडलेल्या बंडखोरांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सणसणीत चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात ‘मातोश्री’चा आदेश झुगारणाऱ्या २६ बंडखोर नेत्यांची थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात अनिल परब यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्याचाही बळी गेला आहे, त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

Shivsena UBT Action BMC Election 2026

यात सर्वात धक्कादायक नाव आहे ते शेखर वायंगणकर यांचं! वांद्रे पूर्व आणि पश्चिममध्ये अनिल परब (Anil Parab) यांचे ‘उजवा हात’ म्हणून त्यांची ओळख होती. पण प्रभाग ९५ मध्ये त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधातच शड्डू ठोकला. वारंवार समज देऊनही त्यांनी माघार घेतली नाही, त्यामुळे अखेर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परबांचे निकटवर्तीय असूनही त्यांची गय केली नाही, यावरून ठाकरे गट निवडणुकीबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होतंय.

दक्षिण मुंबईपासून ते कुर्ल्यापर्यंत जिथे-जिथे बंडखोरी झाली, तिथे थेट कारवाई करण्यात आली आहे. संदीप मोरे (प्रभाग ७४), परशुराम देसाई (प्रभाग १९७), सोनाली म्हात्रे (प्रभाग १७०) अशा अनेक पदाधिकाऱ्यांची नावे या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये आहेत.

बंडखोरीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा थेट फायदा भाजप किंवा शिंदे गटाला होऊ शकतो, हे ओळखूनच ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आली आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म (AB Form) ज्याला मिळाला, त्याच्या विरोधात जाणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, हा कडक संदेश यातून तळागाळातील कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. आता या बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवारांच्या मतांवर किती परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही