Share

अभिनेता कुणाल खेमू मोठ्या अडचणीत; ‘त्या’ २१ लाखांमुळे कोर्टाची पोलिसांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Actor Kunal Khemu faces legal trouble over a fraud complaint involving 21 lakhs; Mumbai court issues notice to police seeking a reply.

Published On: 

Actor Kunal Khemu faces legal trouble over a fraud complaint involving 21 lakhs; Mumbai court issues notice to police seeking a reply.

मुंबई – बॉलिवूडच्या झगमगाटात कधी कोणाचं जुनं ‘कनेक्शन’ अंगलट येईल आणि कोणाला कोर्टाची पायरी चढावी लागेल, हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय आता अभिनेता कुणाल खेमू ( Kunal Khemu ) आणि त्याच्या वडिलांना आला आहे. एका जुन्या व्यवहारावरून बाप-लेकाची जोडी आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हं आहेत. मुंबईतील एका न्यायालयाने थेट पोलिसांनाच याबाबत जाब विचारल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

हे प्रकरण साधंसुधं नसून फसवणूक आणि विश्वासघाताचं आहे. अंधेरी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी सुजीत कुमार सी. तायडे यांनी अंबोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कुणाल खेमू आणि त्याचे वडील रवी खेमू यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर तुमचं म्हणणं काय? असा सवाल कोर्टाने केला आहे. २९ डिसेंबरला दिलेल्या आदेशात कोर्टाने हे स्पष्ट केलंय की, भारतीय नागरी संरक्षण संहितेनुसार पोलिसांची बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे.

Kunal Khemu Fraud Case

नेमकं प्रकरण काय?

चित्रपट निर्माते रवी दुर्गा प्रसाद अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, जवळपास दोन दशकांपूर्वी त्यांनी ‘ओव्हरटेक’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कुणाल खेमूला साइन केलं होतं. कथा ऐकल्यानंतर कुणालने होकार दिला आणि अग्रवाल यांनी त्याला ( Kunal Khemu ) तब्बल २१ लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले.

पैसे घेतल्यावर कुणालने काम पूर्ण केलंच नाही, उलट अजून पैशांची मागणी केली, असा निर्मात्याचा दावा आहे. इतकेच नाही तर, यामुळे व्यवसायाचं मोठं नुकसान झालं. विशेष म्हणजे, २०१४ मध्येही अग्रवाल कोर्टात गेले होते, पण २०१७ मध्ये ते प्रकरण फेटाळलं गेलं. मग आता पुन्हा काय झालं? तर निर्मात्याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तडजोडीचे प्रयत्न फसले असून आरोपींकडून आता नवीन धमक्या येत आहेत, त्यामुळेच हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही