Share

पहाटे ६ वाजता अजित पवार थेट रस्त्यावर; म्हणाले, ‘जे आडवं येईल त्याला उचला!’ पुण्यात धडक कारवाई

Ajit Pawar orders strict action on Hinjewadi road encroachments

Published On: 

Ajit Pawar Orders Strict Action on Hinjawadi Traffic Obstruction

पुणे – हिंजवडी आयटी पार्क परिसरातील सतत वाढणारी वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांची कुचकामी अवस्था पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी पहाटेपासूनच ॲक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात केली. सकाळी सहाच्या सुमारास ते स्वतः हिंजवडीत दाखल झाले आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला.

Ajit Pawar visits Hinjewadi

या दौऱ्यात काही ठिकाणी नागरिकांनी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “सरकारी रस्त्यावर अडथळा करणाऱ्यांवर कलम 353 नुसार गुन्हे दाखल करा. कोणाचंही ऐकू नका. थेट उचला!” असा थेट आदेश त्यांनी (Ajit Pawar) अधिकाऱ्यांना दिला.

अजित पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले की, खासगी जागा बाधित होत असल्यास त्यासाठी मोबदला देण्यात येईल. मात्र सरकारी मालकीच्या जागांबाबत कोणतीही समजूत न करता अतिक्रमण करणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. “सरकारी रस्त्यासाठी कुणालाही मोबदला नाही,” हे त्यांनी ठणकावून सांगितले.

वाहतूक कोंडीसारख्या दीर्घकालीन समस्येवर तोडगा काढताना अजित पवार यांनी रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यावर भर देण्याचे आदेश दिले. “रस्ते छोटे ठेवू नका. मोठेच करा. फोर लेन रस्त्यांची कामं त्वरित सुरू करा,” अशी स्पष्ट सूचना त्यांनी (Ajit Pawar) दिली. या दौऱ्यानंतर प्रशासन हिंजवडीत ( Hinjawadi ) अतिक्रमण हटवण्याची मोहीम वेगात राबवली जाण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install