लाडकी बहिण योजना: महिलांना आता 1 लाखांचं कर्ज ‘शून्य टक्के’ व्याजदराने

Maharashtra govt offers ₹1 lakh loan at 0% interest for eligible women.

Published On: 

Ladki Bahin Yojana

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आता महिलांना आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेने आधीच महिलांना घरबसल्या आर्थिक हातभार दिला आहे, पण आता त्या महिलांना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे.

हा निर्णय मुंबई बँकेकडून घेण्यात आला असून, ही बँक भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या योजनेचा उद्देश लाडक्या बहिणींना केवळ मदतीपुरता मर्यादित न ठेवता, त्यांना उद्योग आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा लक्षात घेऊन बँकेने ही महत्वाची घोषणा केली आहे.

₹1 Lakh Loan at 0% Interest for Women in Ladki Bahin Yojana

यापूर्वी या कर्जासाठी ९ टक्के व्याजदर आकारला जात होता. मात्र आता तो नियम रद्द करण्यात आला असून, बँकेच्या माध्यमातून ० टक्के व्याजदराने कर्ज पुरवण्यात येणार आहे. या सवलतीचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या चार महामंडळांच्या योजनांशी समन्वय साधण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की, 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो.

यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे जर कोणतीही महिला या योजनांच्या निकषात बसत असेल, तर तिला प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते, अशी माहिती दरेकर यांनी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही