‘पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल’; शशी थरुरांचा अमेरिकेतून इशारा

Shashi Tharoor warned from the US that Pakistan will pay a heavy price for supporting terrorism. He said India has already crossed borders to strike back and exposed Pakistan’s real face.

Published On: 

Shashi Tharoor warned from the US that Pakistan will pay a heavy price for supporting terrorism. He said India has already crossed borders to strike back and exposed Pakistan's real face.

न्यूयॉर्क – पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध अजिबात गंभीर नाही, आणि त्यामुळेच पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे खासदार शशी थरुर ( Shashi Tharoor ) यांनी अमेरिकेतून दिला आहे.

भारताकडून सध्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं एक शिष्टमंडळ  दौर्‍यावर आहे. न्यूयॉर्कमधील ( अमेरिका ) भारतीय वाणिज्य दूतावासात मीडियाशी बोलताना थरुर यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.

Shashi Tharoor warns Pakistan from US

त्यांनी सांगितलं की, 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला ठरवून करण्यात आला होता. हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांचा जीव गेला, आणि भारतात हिंसाचार पेटवण्याचा डाव होता. त्यानंतर भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले.

थरुर म्हणाले, “भारत आता केवळ एलओसी पार करत नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हल्ले करतो. यामुळे पाकिस्तानला आता स्पष्ट संदेश दिला गेला आहे – हल्ला केलात, तर किंमत मोजावी लागेल.” तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “भारताला युद्ध नकोय मात्र दहशतवादावर गप्प बसणार नाही!”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही