Share

एजाज खान फरार, बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू

Actor Ajaz Khan is missing after a rape FIR was filed against him in Mumbai. Police teams are searching for him, but he remains unreachable as his phone is switched off. Court has rejected his anticipatory bail.

Published On: 

Actor Ajaz Khan is missing after a rape FIR was filed against him in Mumbai. Police teams are searching for him, but he remains unreachable as his phone is switched off. Court has rejected his anticipatory bail.

मुंबई – अभिनेता एजाज खान याच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान फरार झाला असून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की, एजाज खानने तिला लग्नाचे आश्वासन देत फसवले आणि ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोमध्ये कास्ट करण्याचे आमिष दाखवत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Ajaz Khan Missing After Rape Case Filed in Mumbai

या प्रकरणात एजाज खानने सत्र न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयात २ जून रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, एजाज खानचा मोबाईल फोन बंद असून पोलिसांना त्याचे लोकेशनही मिळू शकलेले नाही. पोलीस सतत शोध घेत आहेत.

उल्लू अ‍ॅपवर स्ट्रीम होणाऱ्या ‘हाऊस अरेस्ट’ शोमधून अश्लीलता पसरवण्याचा आरोपही एजाज खानवर करण्यात आला आहे. शोमधील काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला आणि शो बंद करण्याची मागणी झाली. परिणामी, उल्लू अ‍ॅपवरून हा शो हटवण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही