Share

नवसाच्या नावाखाली महिलेला आळंदीत नेलं, गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार

Woman sexually assaulted in Alandi after being drugged in food by a man with help of a couple she trusted for spiritual advice.

Published On: 

Woman sexually assaulted in Alandi after being drugged in food by a man with help of a couple she trusted for spiritual advice.

अकोला – जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूलबाळ होत नसल्याने उपाय शोधत असलेल्या एका महिलेला धार्मिक नवसाचे आमिष दाखवत बुलढाणा जिल्ह्यातील एका दांपत्याने आणि त्यांच्या साथीदाराने फसवले. महिलेला अंधश्रद्धेच्या नावाखाली आळंदीत ( Alandi ) नेण्यात आले आणि जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

अकोल्यातील पीडित महिला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याच्या संपर्कात आली होती. त्यांनी तिला बार्शीटाकळी तालुक्यातील आसरा देवीच्या दर्शनाचा आणि नवसाचा सल्ला दिला. त्यानंतर दुसरा नवस पूर्ण करण्यासाठी तिला आळंदीत नेण्यात आले.

Woman Drugged and Sexually Assaulted in Alandi

आळंदीतच आरोपी सुरेश पाचपोर याने लॉजवर जेवणात गुंगीचे औषध मिसळून महिलेला बेशुद्ध केले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर महिलेला पुण्यात सोडून देण्यात आले. पीडिता शुद्धीवर आल्यावर अकोल्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी सुरेश पाचपोर तसेच नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याला अटक केली असून पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक वारे करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही