Share

अमेरिका मैदानात उतरली! भारत-पाकिस्तान तणाव मिटवण्यासाठी ‘डायलॉग डिप्लोमसी’

US Secretary of State Marco Rubio steps in to defuse India-Pakistan tensions, holds calls with S. Jaishankar and Pakistan’s top leadership.

Published On: 

Donald Trump reacts to India Operation Sindoor, calls it tragic, and hopes the conflict ends soon.

दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सक्रिय पावले उचलली आहेत. सुरुवातीला या तणावावर अमेरिका भूमिका घेण्यास टाळाटाळ करत होती. परंतु आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी थेट हस्तक्षेप करत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधला आहे.

रुबियो यांनी दोन्ही देशांनी थेट संवाद सुरू करून गैरसमज टाळावेत, अशी भूमिका मांडली. तसेच अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशीही चर्चा केली होती.

US Offers Mediation in India-Pakistan Tensions

अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस यांनी सांगितले की, रुबियो यांनी तणाव निवळावा आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी सकारात्मक संवाद सुरू व्हावा, यासाठी दोन्ही देशांना प्रोत्साहित केले आहे.

दरम्यान, सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनीही भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही