Share

ओबीसी आरक्षण वाद पेटणार? लक्ष्मण हाके यांचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल

OBC leader Laxman Hake launched a fierce attack on the Devendra Fadnavis government over the Maratha reservation issue, warning of a massive OBC rights protest if the Shinde committee report is accepted.

Published On: 

OBC leader Laxman Hake launched a fierce attack on the Maharashtra government over the Maratha reservation issue, warning of a massive OBC rights protest if the Shinde committee report is accepted.

🕒 1 min read

पंढरपूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही काळ थंडावला असताना पुन्हा एकदा नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठा समाजासाठी शिंदे समितीने दिलेल्या अहवालावरून ओबीसी समाजात तीव्र संताप आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

हाके म्हणाले, “मराठा समाजासाठी जे शरद पवारांच्या काळातही शक्य झालं नाही, ते फडणवीसांच्या काळात झालं.” त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या यशाचे कौतुक करताना, फडणवीस सरकारवर ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा आरोप केला.

शिंदे समितीने ८ लाख २५ हजार ८५१ जणांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला आहे. यावरून हाके यांनी फडणवीसांना प्रश्न विचारले की, ही माहिती खरी आहे का? तसेच त्यांनी विचारले की, “बालुतेदार, अलुतेदार, भटक्या-विमुक्तांच्या हक्कांचे संरक्षण फडणवीस सरकारने कसे केले?”

तसेच, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांची जरांगे यांच्याशी झालेली भेट आणि नंतरचे आंदोलन यामागे काही षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करत, “त्यांना ओबीसी आरक्षण संपवायचं आहे का?” असा थेट सवाल हाके यांनी उपस्थित केला.

Laxman Hake criticizes Devendra Fadnavis over Maratha reservation

लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट इशारा दिला की, “शिंदे समितीचा अहवाल जाहीर झाल्यास ओबीसी समाज मोठे आंदोलन छेडेल. ओबीसी समाजाचे लोक आमदार, मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या देतील आणि त्यांना घराबाहेरही पडू देणार नाही.”

या पार्श्वभूमीवर आगामी काळात राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!