Share

”‘उद्या कुणी तुम्हालाही मंत्री करा म्हणेल’; Dhananjay Munde प्रकरणावर अजित पवारांचा टोला”

Deputy CM Ajit Pawar responded to the demand for Dhananjay Munde’s return to the cabinet, stating that no decision will be made until the ongoing investigations are complete. “A CID probe, police inquiry, and SIT investigation are underway. Once reports are submitted, the CM and both Deputy CMs will decide accordingly,” he said.

Published On: 

Hopes Fade for Dhananjay Munde’s Cabinet Return | Ajit Pawar on Ministerial Decision

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद देण्याची चर्चा सध्या रंगत असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “कोणी काहीही म्हणू शकतो. उद्या एखादा म्हणेल, तुम्हाला मंत्री करा. पण मधल्या काळात जी घटना घडली, तिची चौकशी सुरु आहे. सीआयडी चौकशी, पोलीस तपास आणि एसआयटी नियुक्त करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील,” असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar responded to the demand for Dhananjay Munde return to the cabinet

हिंदी भाषा अनिवार्य केल्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, काम नाही. त्यामुळेच हे असे विषय उचलले जात आहेत.” ते पुढे म्हणाले, “मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिच्याबद्दल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा प्रिय असते आणि ती टिकली पाहिजे.”

”तुमच्या आमच्या कोणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात रहायचं असेल, तर मराठी आलच पाहिजे. भारतात अनेक राज्यात हिंदी भाषा बोलली जाते. काही म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे. त्याच्यावर वाद आहे. पण मला त्या वादात शिरायच नाही. सध्या कोणाला उद्योग नाहीयत, काम नाहीयत. त्यामुळे ते अशा गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत” असल्याचे म्हणत पवारांनी राज ठाकरेंना टोला लगवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही