Vijay Wadettiwar । चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी विजय मिळवला. पण आता त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
विजय वडेट्टीवार यांच्याकडून नामनिर्देशक पत्रासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट नारायण जांभुळे (Narayan Jambhule) यांनी उच्च न्यायालयात (High Court) निवडणूक याचिका (Election Petition) दाखल केली आहे.
इतकेच नाही तर वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले तोच स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार यांनी स्वतः च्या नावे खरेदी केला. स्टॅम्प कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध असल्याचा दावा जांभुळे यांनी केला आहे.
“एका व्यक्तीच्या नावाने खरेदी करण्यात आलेला स्टॅम्प पेपर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वापरता येत नसल्याने वडेट्टीवार यांचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरवावे आणि त्यांची नामनिर्देशन याचिका रद्द करावी”, अशी विनंती जांभुळे यांनी केली आहे.
HC summons to Vijay Wadettiwar over election fraud allegations
याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावला असून वडेट्टीवार यांना 25 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करावे लागणार आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांची आमदारकी धोक्यात आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता वडेट्टीवार काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- “मुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही, त्यांनीच…”; Manoj Jarange Patil यांचा गंभीर आरोप
- Manikrao Kokate यांच्या अडचणीत भर, नाशिक जिल्हा बँकेकडून नोटीस; नेमकं कारण काय?
- “राजकीय दबाव टाकून महिलेवर अत्याचार होत असल्यास ….”; Disha Salian प्रकरणी संजय शिरसाट यांची मागणी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







