Share

Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याची शक्यता? Ajit Pawar घेणार महत्त्वाची बैठक

It is being said that the pressure on Ajit Pawar has also increased due to the resignation of Dhananjay Munde. Soon they will hold a meeting in Beed.

by MHD

Published On: 

Ajit Pawar will hold an important meeting in Beed

Ajit Pawar । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी वाल्मिक कराड (Walmik Karad) वर संशय केला जात आहे. हाच वाल्मिक कराड अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे.

यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही दबाव वाढला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचीदेखील भेट घेतली होती. भेटीदरम्यान, जर मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध असला तर त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल असा इशारा अमित शाह यांनी दिला आहे.

तसेच मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी काल दिलेले पुरावे आज अजित पवार हे फडणवीस यांना दाखवणार आहे, यामुळे अजित पवार हे आता मुंडेंचा घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Ajit Pawar Meeting in Beed

अशातच आता येत्या 30 जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काही निर्णय घेतात का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही