Share

Amol Mitkari यांनी केला बजरंग सोनावणे आणि Walmik Karad चा फोटो ट्विट; म्हणाले…

अमोल मिटकरींनी जो फोटो शेअर केला त्यामध्ये बजरंग सोनावणे यांच्यासोबत वाल्मिक कराड बसल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर या फोटो सोबत अमोल मिटकरी यांनी लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं…. असं कॅप्शन दिलं आहे.

Published On: 

Amol Mitkari यांनी केला बजरंग सोनावणे आणि Walmik Karad चा फोटो ट्विट; म्हणाले...

Amol Mitkari | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडीला शरण गेला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्यासह सुधीर सांगळेला (Sudhir Sangle) पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी एक ट्वीट करत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी एक फोटो शेअर करत बजरंग सोनावणे यांना डिवचलं आहे.

अमोल मिटकरींनी जो फोटो शेअर केला त्यामध्ये बजरंग सोनावणे यांच्यासोबत वाल्मिक कराड बसल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर या फोटो सोबत अमोल मिटकरी यांनी लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं…. असं कॅप्शन दिलं आहे. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलं असून यावर बजरंग सोनावणे काही प्रत्युत्तर देतात का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही