Share

लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते ‘या’ दिवशी होणार जमा; किती आणि कोणाला मिळणार पैसे? वाचा बातमी

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana First Installment Of 3000 To Be Deposited On 17th August Maharashtra Government Declared

Published On: 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana First Installment Of 3000 To Be Deposited On 17th August Maharashtra Government Declared

Ladki Bahin Yojana । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ( Ladki bahin yojana ) 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासनाकडे जमा झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत.

लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमातून दिला जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमात उपस्थित राहतील.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana First Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार असून याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे,  लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनापूर्वीच (Rakshabandhan) या योजनेचा दोन्ही हप्ते 3000 रुपये बहि‍णींना ओवाळणी म्हणून मिळणार आहे. 17 ऑगस्टला योजनेचे दोन्ही हप्ते 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

WebTitel – Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana First Installment Of 3000 To Be Deposited On 17th August Maharashtra Government Declared

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही