पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नव्हे तर ‘कायद्याचा पॅटर्न’; पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा

Amitesh Kumar पुणे : शहरात गेल्या आठवड्यात सलग चार गोळीबाराच्या घटना घडल्या. मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात मुळशी पॅटर्न नव्हे तर कायद्याचा पॅटर्न चालणार, असा इशारा गुंडांना दिला. गोळीबार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांची झाडाझडती … Read more

Published On: 

Amitesh Kumar पुणे : शहरात गेल्या आठवड्यात सलग चार गोळीबाराच्या घटना घडल्या. मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात मुळशी पॅटर्न नव्हे तर कायद्याचा पॅटर्न चालणार, असा इशारा गुंडांना दिला.

गोळीबार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. महिनाभरात बेकायदा पिस्तुले बाळगल्याप्रकरणी २८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४२ पिस्तुले आणि ७४ काडतुसे जप्त करण्यात आली. पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी पुण्यात फक्त कायद्याचा पॅटर्न चालणार असल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते. गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, तडीपार, मोक्का कायद्यान्वये कारवाईत जामीन मिळवलेल्या सराइतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही