Sunetra Pawar पुणे : महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीने कंबर कसली आहे. एकेकाळचे राजकीय विरोधक असलेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, बाबा जाधवराव आणि अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी रविवारी पुरंदरमध्ये संयुक्त दौरा करत प्रचार केला.
शिवतारे यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर शिवतारे हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
तसेच उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर, इंदापूर, खडकवासला, भोर आणि दौंड अशा तालुक्यांमधील जुन्या-जाणत्या नेत्यांची भेट घेत आहेत. पवार यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाचवेळा निवडून आलेले माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबाराजे जाधवराव हे देखील सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. रविवारचा मुहूर्त साधत पुरंदर तालुक्यात महायुतीचे सर्व नेते एकवटले होते. त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली. शिवतारे, बाबा जाधवराव आणि जय पवार यांनी संयुक्त दौरा केला. पुरंदर तालुक्यातील मांडकी येथून हा दौरा सुरू झाला. पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यांनी लोकसभा निवडणुकीत मुलाला पाडलं, त्यांच्याच प्रचारासाठी अजित पवारांनी काढली रॅली
- भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये
- शाळकरी मुलांना प्रचारात वापरणाऱ्या शाळा संचालकांवर कारवाई; मात्र नितीन गडकरींना दिलासा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







