Share

बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला राम राम; पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार?

🕒 1 min read Bajrang Sonwane | बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाला राम राम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सोनवणे यांनी प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्याविरोधात 2019 ची लोकसभा निवडणुक लढवली होती.  पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरोधात (Bajrang Sonawane) पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bajrang Sonwane | बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाला राम राम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सोनवणे यांनी प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्याविरोधात 2019 ची लोकसभा निवडणुक लढवली होती. 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरोधात (Bajrang Sonawane) पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरोधात बजरंग सोनवणे असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.

भाजपकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना  उमेदवारी जाहीर झाल्यास पंकजा मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात अजित पवार गटामध्ये सामील झाले होते. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते.

बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणे म्हणजे धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्का मानला जातोय तसेच पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. बजरंग सोनवणे यांना महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेची उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे (विनायक मेटेंच्या पत्नी) यांची नावे महाविकास आघाडीकडून चर्चेत आहेत. अशात बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. तसेच आज ते पुण्यात शरद पवारांच्या गटाच्या महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

Bajrang Sonwane resigned from Ajit Pawar NCP join Sharad Pawar group

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही